अर्थपूर्ण कोणासाठी


प्रामाणिक, समृद्ध आणि शांत जीवनाच्या
शोधात असलेल्या प्रत्येकासाठी ..

भारतीय लोकशाहीला आता चांगल्या
प्रशासनाची आणि आर्थिक व्यवस्थापनाची
गरज आहे, हे मानणार्‍या प्रत्येकासाठी ...

आपले हक्क आणि कर्तव्ये सारखीच
महत्वाची आहेत, ह्या तत्वावर विश्वास
ठेवणार्‍या प्रत्येकासाठी ...

भारतातील सर्व विषमतेला नकार देणार्‍या
आणि समन्यायी समाजव्यवस्थेचे स्वप्न
पाहणार्‍या प्रत्येकासाठी ...

व्यवस्थेमध्ये आता मूलभूत बदल झाले
पाहिजेत असे मानणार्‍या आणि त्यासाठी
सक्रिय होण्याची तयारी असणार्‍या
प्रत्येकासाठी ...

काहीतरी करण्याची इच्छा आहे पण
चांगला मार्ग सापडत नाही, असे वाटणार्‍या
प्रत्येकासाठी ..

१२० कोटी जनतेला देशबांधव मानतो
आणि विकासाची फळे सर्वांपर्यंत
पोहोचली पाहिजेत, असे वाटणार्‍या
प्रत्येकासाठी ...

व्यवस्थेतील मिंधेपणा संपवून सर्वांना मानाने
जगण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे,
असे ज्याला ठामपणे वाटते अशा प्रत्येकासाठी ..

सुजलाम् सुफलाम् भारताचे स्वप्न पुन्हा
पाहणार्‍या प्रत्येक तरुणासाठी ...'अर्थपूर्ण'मध्ये आपण वाचाल -

 • जागतिक पातळीवरील वा भारताच्या आर्थिक
  घडामोडी चे विश्लेषण व त्याकडे बघण्याचा
  प्रामाणिक आणि आशेचा दृष्टिकोन..
 • आर्थिक साक्षरतेचे विषय..
 • आर्थिक गुंतवणुकी विषयी दृष्टिकोन ..
 • अर्थपूर्ण जगणे म्हणजे काय..
 • व्यवस्थेमधील आवश्यक असलेल्या
  बदलाविषयी अर्थक्रांतीने मांडलेले उत्तराचे
  तपशील व त्यावरील अपडेट..


सभासद होण्यासाठीची नोंद
आपण इथून करू शकता.आपण प्रतिक्रिया सविस्तरपणे
इथे वाचू शकता आणि
पाठवू देखील शकता.अर्थपूर्ण जीवनाच्या दिशेने
जाणारे कोणतेही चिंतन,
कृती शब्दबद्ध करा आणि
आमच्याकडे पाठवा.